धान पिकाची नासाडी;शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बातमी संकलन धीरज ठाकरे (गोंदिया)
सडक अर्जुनी तालुक्यातील बकी- मेंढकी, कोसबी परिसरात रविवारपासून हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (दि. 3) चौथा दिवशी हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ कायम होता. त्यामुळे या परिसरातील उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली आल्याने पीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परराज्यातून जिल्लामार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेले जंगली हत्ती नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसरात ठाण मांडून बसले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्याने मानवाचा अवाजवी हस्तक्षेप कमी होऊन मानवरहित क्षेत्र तयार झाले आहे. विस्तीर्ण जंगल प्रदेश मुबलक प्रमाणात चारा-पाण्याची सोय या ठिकाणी आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी या ठिकाणी वनग्राम असलेले कालीमाती, कवलेवाडा, झनकारगोंदी या गावांचा पुनर्वसन झाल्याने हा भाग मानवविरहित होऊन जंगली प्राण्यांसाठी सुरक्षित (गामा क्षेत्र (कोअर क्षेत्र) तयार झाले. वनक्षेत्रालगतचा भाग हा बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, या बफर क्षेत्रात कोसबी, कोहलगाव, बकी, मेंढकी, कोसमघाट, चिखली, कनेरी, मनेरी, - कोकणा आदी गावे येतात. शेती हाच मुख्य व्यवसाय असून, खरीप व रब्बी हंगामात धान हाच मुख्य पीक घेतात. सोबतच मक्याचीही या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मागील आठवडयात हत्तीच्या कळपाची या परिस
रात पुन्हा एन्ट्री झाली आहे. जवळपास २४ संख्येत असलेले हत्तीचे कळप रात्रीच्या वेळेस शेतातील मका व धान पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकन्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकन्यांकडून केली जात आहे