🚔🚔पेट्रोलिंग करत असलेल्या दोन पोलिसांना मारहाण....🚔🚔

 



अवैध धंदे करणाऱ्या लोकांना एवढी धाडस आले कुठून...?






गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून अवैध धंदे होत असतात आणि जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन हा दिवसा बरोबर रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करून या अवैध धंदे कसे थांबता येईल याबाबत कार्य करत असतात आणि अवैध धंदे थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत असतात. पण पोलिसांन सोबतच अवैध धंदे करणारे मारहाण करत असतील तर काय समजावे लागेल असा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसा या गावात एक अशीच घटना घडली आहे.रात्रीच्या सुमारास दोन पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना अवैध धंदे करीत असलेल्या काही लोकांनी पोलिसाना पाहताच त्यांच्यावर हल्ला करीत पोलिसाना पकडून बांधून ठेवत मारहाण केली या मारहाणी मध्ये दोन पोलीस जखमी झाले याविषयी आमगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोह्चले पोलिसांना पाहताच आरोपीने त्या ठिकाणातून फळ काढला त्यात मारहाण झालेल्या दोन्ही पोलिसांना आणण्यात आले. पोलिसांची तक्रार दाखल करण्यात आली आणि त्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी कारवाई करीत दोन पोलिसांना मारहाण करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली.इतर आरोपींच्या शोध घेणे सुरू आहे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा सोबत भादवी 395, 334, 504, 506, 365 अशा विविध कलमान द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास आमगाव पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post