सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती हे बेरोजगारीला आमंत्रण - तीरथ येटरे
राज्यात जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुने शिक्षक पुन्हा शिकवायला येणार असल्याने विद्यार्थी वेलकम बॅक गुरुजी म्हणणार आहेत.शिक्षक भरतीसाठी बनवलेल्या 'पवित्र' या ऑनलाइन प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीद्वारे शिक्षक नेमण्यात बराच वेळ जाणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय ७ जुलै रोजी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.नियोजित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरती प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती हे बेरोजगारीला आमंत्रण - तीरथ येटरे
अनेक क्षेत्रात सरकारने भर्ती प्रक्रियेत घोळ निर्माण करुण ठेवला आहे .तू मारल्या शारख कर मी रडल्याशारख करतो अशी परिसथिति सरकारने केलेली आहे . तसेच राज्यात जि.प.शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचे जे निर्देश केले आहे हे बेरोजगारी ला निमंत्रण देना सारखे आहे. व उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरती प्रक्रियेत विलंब होत आहे . ही महाराष्ट्र सरकार चा बेरोजगारी वादविनाचा डाव आहे .