शिक्षक दिनी १०८ विद्यार्थी बनले शिक्षक..!
सुमित ठाकरे/आमगाव
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे सकाळ पाळीत लागणाऱ्या वर्ग ५ ते ७ व कनिष्ठ महाविद्यालय कला विभाग या मधून शिक्षक दिनी १०८ विद्यार्थी शिक्षक, १० विद्यार्थी परिचर व ४ विद्यार्थी यांनी मुख्याध्यापकाची भूमिका बजावली.आपल्या गुरुजनाप्रती आदर म्हणून शिक्षक दिनी आपल्या शिक्षकांच्या कामाचे अनुकरण करावे ही परंपरा आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसारखे पेहराव करून ३ तास पर्यंत शाळा सांभाळली व विद्यादानाचे कार्य केले. स्वयंशासन हा गुण निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी असे उपक्रम शाळेत घेतले जातात.
या प्रसंगी आयोजित शिक्षक दिवस कार्यक्रमात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलंन करण्यात आले.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेषातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधत होता. मंचावर अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षक यु एस मेंढे व प्रमुख वक्ते म्हणून सौ अपाले मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री जि एस शेंडे, श्री वी टी भुसारी हे होते.या समारोहात विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे आभार म्हणून सर्वांचे पुष्पगुछाने स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकंचे आभार व्यक्त करून आपले मनोगत व गीत सादर केले.