महादेव पहाडीजवळ रेल्वेसमोर उडी घेऊन बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या
नरसरी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांने नापास झाल्यामुळे हातास झालेल्या मुलाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली. मोहित चंद्रप्रकाश पटले (१७) रा. ननसरी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. हा विद्यार्थी आदर्श विद्यालय आमगांव येथील विद्यार्थी होता.ही घटना आमगावच्या महादेव पहाडी जवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. सायंकाळी ७ वाजता ही घटना वाऱ्यासारखी पसरतात आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले या घटनेसंदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे व पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत.